बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर म्हसवड पोलिसांचा दमदार रूट मार्च

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड प्रतिनिधी :

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी म्हसवड पोलीस स्टेशनच्या वतीने आज सायंकाळी भव्य रूट मार्च काढण्यात आला. पोलिसांच्या या रूट मार्चचा उद्देश नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी व असामाजिक प्रवृत्तींना स्पष्ट इशाराच होता.

सायंकाळी ६ ते ७ या वेळेत काढण्यात आलेल्या या रूट मार्चची सुरुवात म्हसवड पोलीस स्टेशन येथून करण्यात आली. त्यानंतर चांदणी चौक, एसटी स्टँड परिसर, महात्मा फुले चौक, नगरपालिका इमारत समोरील मुख्य रस्ता, मुख्य पेठ, शिंगणापूर चौक असा प्रमुख मार्ग व्यापत पुन्हा पोलीस स्टेशन येथे रूट मार्चची सांगता करण्यात आली.

सदर रूट मार्चमध्ये २ पोलीस अधिकारी व २० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. पोलिसांकडे रायफल, लाठी तसेच ढालींसह बंदोबस्त साहित्य होते. शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे व संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी विशेष पाहणी करत नागरिकांना शांतता व सौहार्द कायम राखण्याचे आवाहन केले.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *