कै. सचिन माने यांच्या कुटुंबाला नीलमताई शिर्के-सामंत यांचा मदतीचा हात
व्हिजन २४ तास न्यूज
मुंबई प्रतिनिधी – गणेश तळेकर
आचार्य अत्रे रंगमंदिराचे साऊंड ऑपरेटर कै. सचिन माने यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या आर्थिक व मानसिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या नीलमताई शिर्के-सामंत यांनी माने कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
यावेळी ‘श्री श्री बालाजी’ संस्थेतर्फे माने कुटुंबाला १ लाख रुपयांची, तर बालरंगभूमी परिषद, मध्यवर्तीतर्फे १० हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.
याशिवाय, कै. माने यांच्या पत्नीला रोजगार उपलब्ध करून देण्याची तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा नीलमताई शिर्के-सामंत यांनी केली. या कठीण काळात माने कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नीलमताई शिर्के-सामंत यांच्या या सामाजिक उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, संकटग्रस्त कलाकारांच्या कुटुंबांना आधार देण्याच्या त्यांच्या संवेदनशील भूमिकेचे स्वागत करण्यात येत आहे.

