जीवाची पर्वा न करता पाच जणांना दिले जीवनदान; इरफानभाई मुजावर यांचा करणभैय्या पोरे मित्र समूहाकडून गौरव

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड, प्रतिनिधी :

तांदूळवाडी येथील भीषण अपघातात विहिरीत कोसळलेल्या वाहनातील पाच जणांचे प्राण धाडसाने वाचविणाऱ्या इरफानभाई मुजावर यांचा करणभैय्या पोरे मित्र समूहाच्या वतीने विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला.

म्हसवड–पंढरपूर महामार्गावरील तांदूळवाडी येथे नुकत्याच घडलेल्या अपघातात एक चारचाकी वाहन विहिरीत कोसळले होते. या दुर्घटनेत वाहनातील प्रवाशांचा जीव धोक्यात आला असताना इरफानभाई मुजावर यांनी क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उडी घेत बचावकार्य सुरू केले. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी पाच जणांना सुखरूप बाहेर काढून माणुसकीचे दर्शन घडविले.

त्यांच्या या धाडसी आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत करणभैय्या पोरे मित्र समूहाच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी इरफानभाई यांच्या साहसी वृत्तीचे कौतुक करत संकटसमयी दाखविलेली तत्परता समाजासाठी आदर्श असल्याचे सांगितले.

या प्रसंगी करणभैय्या पोरे, ॲड. शुभम पोरे, बाळासाहेब पिसे, निखिल पिसे, इम्रान मुल्ला, इर्शाद काझी, सोहेल मुल्ला, सलीम मुल्ला, दाऊद मुल्ला, सद्दाम पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

इरफानभाई मुजावर यांच्या या पराक्रमामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या धाडसाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *