शिव-प्रणिती फाऊंडेशनची शैक्षणिक कौतुकास्पद मदत ; दोन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची स्विकारली संपूर्ण जवाबदारी
व्हिजन २४ तास न्यूज
नांदेड: प्रतिनिधी (उध्दव सरोदे )
सामाजिक,शैक्षणिक व मानवतावादी कार्यात अग्रेसर असलेल्या शिव-प्रणिती फाऊंडेशनने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांसाठी एक मदतीचा हात पुढे केला आहे.
सेवा,शिक्षण, पर्यावरण,साहित्य व अध्यात्म या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेने सर्वप्रथम उमरी तालुक्यातील सोमठाणा येथील दोन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याची संपूर्ण जवाबदारी स्वीकारून त्यांना शैक्षणिक फार मोठा आधार दिला आहे.
सदर विद्यार्थ्यांच्या वडिलाचे कॅन्सर या दुर्धर आजाराने निधन झाल्यामुळे त्यांच्या आईवर ३ मुलांच्या संगोपनासह शिक्षणाची फार मोठी जबाबदारी आली.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आई कष्ट करून मुलांचे शिक्षण सुरू ठेवत आहे.या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन शिव-प्रणिती फाऊंडेशनने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून या २ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजि.प्रविण जाधव पिंपळ दरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली.यावेळी संस्थेचे सदस्य योगेश पाटील मोरे,प्रा.पांडुरंग जाधव सर, संतसेवा प्रतिष्ठानचे राजेश मोरे,नूतन माध्यमिक विद्यालय उमरीचे मुख्याध्यापक लखमोड सर,हैबते सर,शिंदे सर आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजातील संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.शिव-प्रणिती फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे सर्व सरातून कौतुक होत असून संस्थेचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे असे त्यांच्या कार्यातुन अभ्यासु नागरिकांना दिसत आहे.

