फलटणात रणरागिणी संस्थेकडून बुद्ध जयंती, महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरे; कामगारांचा गौरव

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

फलटण :प्रतिनिधी 

रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने बुद्ध जयंती व बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या त्रिसंयोगी औचित्याने एक भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. समाजप्रबोधन, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे महत्त्व अधोरेखित करत मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कष्टकरी कामगारांचा विशेष सत्कार करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष श्री. इम्रान सिकंदर सय्यद यांनी भूषविले. यावेळी श्री. अतुल शाह, खजिनदार श्री. कैफ शेख, सचिव श्री. मारुती टकले, संचालिका व माजी प्राचार्य श्रीमती शाहीन शेख, सौ. रझिया शेख, सौ. माया बनसोडे, उपशिक्षिका सौ. सीमा हिंदुराव मुळीक, सौ. सविता शिंदे, सौ. अनिसा सय्यद, सौ. प्रीती शाह, सौ. हिना सय्यद, कु. सना शेख यांसह डिजिटल मीडियाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक-संचालिका व संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध प्रेरणादायी भाषणे, सामाजिक संदेश आणि कामगारांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी समाजाच्या प्रगतीत कामगारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.

कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सर्व उपस्थितांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *