क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवड चे उज्वल यश

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 
म्हसवड:- प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ एच एस सी  परीक्षा 2026 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून .या परीक्षेमध्ये क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवड विज्ञान शाखेमध्ये कुमारी सेजल प्रवीण फडतरे हिने 80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल  अंतर्गत क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवड मधील इयत्ता 12वी परीक्षा निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. ज्युनिअर शाखेचा एच एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल 98 टक्के लागला असून प्रथम तीन क्रमांक व मिळालेले गुण
पुढीलप्रमाणे –  फडतरे सेजल प्रविण 80 टक्के, द्वितीय क्रमांक- लांब ओम दत्तात्रय 72 टक्के,
तृतीय क्रमांक – घुटुकडे सौरभ शांताराम 70 टक्के. विशेष म्हणजे म्हसवड पंचक्रोशी मध्ये टक्केवारी मध्ये सर्वात जास्त निकाल व वैयक्तिक टक्केवारी जास्त मिळवण्याचा बहुमान क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेजने पटकविला आहे
क्रॉप सायन्स या विषयात २०० गुणांपैकी मिळविलेले प्रथम क्रमांक- जावीर अनुजा दिपक 189 गुण
द्वितीय क्रमांक – कापसे शिवानी दिलीप 187 गुण
तृतीय क्रमांक – खांडेकर आशा सुखदेव 181 गुण.
माहिती व तंत्रज्ञान या विषयात 100 गुणांपैकी मेधा कृष्णराज जाधव प्रथम क्रमांक 97 गुण.
द्वितीय क्रमांक – घुटुकडे सौरभ शांताराम 96 गुण व
सरतापे नेत्रा मनोज
96 गुण
तृतीय क्रमांक – कलढोणे अविनाश दत्तात्रय 92 गुण.
ज्युनियर कॉलेजमधील सर्व यशस्वी विद्यार्थांचे  संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर ,सचिव सौ.सुलोचना बाबर,
संस्था उपाध्यक्ष ॲड. इंद्रजीत बाबर , संचालक तात्यासाहेब औताडे, प्राध्यापिका शरयू देवकर ,
सौ. हर्षदा इंद्रजीत बाबर तसेच प्राचार्य विठ्ठल लवटे व सर्व शिक्षक, पालक  यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *