म्हसवडमध्ये श्री संत नामदेव महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा!

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड :प्रतिनिधी 
म्हसवड येथील संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री संत नामदेव महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जन्मोत्सवानिमित्त मंदिरात काकड आरती, प्रभात फेरी तसेच भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महिला भगिनींनीही मोठ्या उत्साहाने जन्मोत्सव सोहळ्यात सहभाग घेत संत नामदेव महाराजांच्या कार्याचा गौरव केला.

या सोहळ्याचे औचित्य साधून इंजिनियर सुनील पोरे यांनी श्री संत नामदेव महाराज मंदिरासाठी पसायदान फलक भेट दिला. या फलकाचे अनावरण रामचंद्र चांडवले व भिकू चांडवले पोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत संत नामदेव महाराजांच्या विचारांचे आणि कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

दरम्यान, इंजिनियर सुनील पोरे हे गिरणार परिक्रमा यात्रेसाठी रवाना होणार असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. दत्तभक्त गणेश रसाळ व पत्रकार विजय टाकणे यांनी त्यांचा सत्कार करून गिरणार यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.

या जन्मोत्सव सोहळ्यास जगन्नाथ चांडवले, राजेंद्र फुटाणे, दीपक फुटाणे, जगन्नाथ पोरे, रमेश पोरे यांच्यासह संत नामदेव शिंपी समाजातील बांधव, महिला भगिनी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत नामदेव महाराजांच्या भक्ती, समता आणि मानवतेच्या विचारांचा जागर करत हा जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *