जयकुमार गोरे (भाऊ) यांना वडूज शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांचा पाठिंबा

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)

वडूज, दि. 14 :
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी_महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या नेतृत्वाखाली माण-खटावचा विकास साधण्यासाठी वडूज शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. इम्रान पठाण, बाशुमिया मनोरे, लियाकत बागवान, अनिल (अण्णा) गोडसे, विकल्पशेठ शहा, संभाजी गोडसे (मंत्री), गणेशशेठ गोडसे यांसारख्या मान्यवरांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावून भाऊंच्या ध्येयधोरणांना पाठिंबा दिला.

भाजप महायुतीच्या उमेदवार जयकुमार गोरे यांच्या समाजसेवेतील तळमळ, माण-खटाव तालुक्याच्या दुष्काळमुक्तीची व हरितक्रांतीच्या दिशेने केलेल्या कामाची दखल घेऊन या मान्यवरांनी त्यांना विकासाच्या दिशेने साथ दिली आहे. शैक्षणिक आणि औद्योगिक क्रांतीच्या स्वप्नांना साकारण्यासाठी त्यांना वडूजच्या जनतेचा पाठिंबा मिळाल्याने त्यांना काम करण्याची ऊर्जा मिळत असल्याचे गोरे यांनी नमूद केले.

याप्रसंगी अंकुश (भाऊ) गोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत “माण-खटावचा विकास साधण्यासाठी आपला संपूर्ण पाठिंबा आहे. आपला हा निर्णय जयकुमार गोरे यांना ऐतिहासिक विजय मिळवून देईल, याची मला खात्री आहे,” असे मत व्यक्त केले.

वडूज शहरात मोठ्या संख्येने नागरिक आणि मान्यवर उपस्थित राहिल्यामुळे जयकुमार गोरे यांच्यासाठी हा पाठिंबा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *