चि. वसिम शेख ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद.
व्हिजन २४ तास न्यूज
गोंदवले खुर्द :-
वसिम रयत शिक्षण संस्थेचे गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द ता. माण या विद्यालयात इयत्ता 7 वी मध्ये शिक्षण घेत आहे. वसिम सादिक शेख याने 26एफ्रिल 2026 रोजी स्पोर्ट्स ऍथोरेटी स्टेडियम (SAI) हैदराबाद येथे आयोजित कराटे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे.
या स्पर्धेत वसिम याने अवघ्या २० मिनिटांच्या नॉन-स्टॉप सादरीकरणात तब्बल ४० काता पूर्ण केले. या कामगिरीमध्ये ३२० ब्लॉक, ४२० पंच आणि ८४० बेसिक तंत्रांचा समावेश होता. त्याचे सादरीकरण वेगवान, अचूक आणि अत्यंत शिस्तबद्ध असल्याने उपस्थित पंचांनी, मान्यवरांनी वसिम चेन कौतुक करून शुभेछा दिल्या. या विक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत भारत देशातून विविध राज्यातून(महाराष्ट्र, कर्नाटक,उत्तर प्रदेश,दिल्ली,मद्रास,तेलनग्न, मध्य प्रदेश, गोवा,) सुमारे २७०० स्पर्धक सहभागी झाले होते.
या यशामुळे गोंदवले व राणंद गावासह संपूर्ण माण तालुका आणि सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. वसिम ने मिळवलेल्या यशाचे माणकरी मा जी प सदस्य (श्री.संदीपभाऊ शिंदे ब्लॅक बेल्ट 2nd दान कोंढवे ता.सातारा अध्यक्ष गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी , युनिफाईट असोसिएशन जिल्हा अध्यक्ष, जंपरोप असोसिएशन जिल्हा अध्यक्ष ) ,कराटे प्रशिक्षक ओकीनावा मार्शल आर्ट चे मास्टर्स ( श्री.आप्पा जाधव सर ब्लॅक बेल्ट 5th दान खडकी ता.वाई ), (श्री.अविनाश गोंधळी सर ब्लॅक बेल्ट 6th दान कुडाळ ता.जावली ), (श्री. नितीन सुर्यवंशी सर ब्लॅक बेल्ट 5th दान मालगाव ता. सातारा), (श्री. गणेश शिंदे सर ब्लॅक बेल्ट 6th दान सोनगाव ता. जावली ), (श्री. अक्षय साळुंखे सर ब्लॅक बेल्ट 5th दान नागठाणे ता. सातारा ) (श्री डॉ रवी पवार सर ब्लॅक बेल्ट 2 दान सांगली,)श्री. विनोद माटे सर ब्लॅक बेल्ट 3rd दान भुंईज ता.वाई , ओकीनावा मार्शल आर्ट ग्रुप गोंदवले खुर्द तालुका माण चे श्री. विजय अवघडे सर ब्लॅक बेल्ट 2nd दान, श्री. सादिक शेख सर ब्लॅक बेल्ट 1st दान, आदिनाथ शिंदे सर ब्लॅक बेल्ट 1st दान, अजिंक्य अवघडे, प्रेरणा गायकवाड आदींचे मार्गदर्शन लाभले.
वसिम ला घरातून प्रोत्साहन मिळाले ते त्याचे आजोबा श्री. दादासाहेब शेख, आई Adv. सौ. करिश्मा शेख, वडील श्री. सादिक शेख , श्री. आलम शेख, श्रीमती हसीना इनामदार तसेच कुटुंबातील बंधू भगिनी. सर्वांचे वसिम ने मिळवलेल्या सुवर्ण यशा बद्दल रयत शिक्षण संस्था पदाधिकारी, शिक्षण विभाग शासकीय पदाधिकारी, Adv. श्री. प्रभाकर कारंडे,श्री. मधुकर मोरे आबा, मुख्याध्यापक श्री. नदाफ एन. डि. तसेच युनिफाईट, जंप रोप , थोडा स्पोर्ट्स,स्किल डो, रेन बु कान, ओकिनावा .या सर्व संघटनेचे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी वृंद, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ माण तालुक्यातील सर्व सामान्य व्यक्ति पासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून वसिम वर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

