दहिवडीत घरफोडीच्या प्रयत्नाने खळबळ; महिलांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव फसला

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

दहिवडी :प्रतिनिधी 

दहिवडी पोलीस ठाणे हद्दीत दहिवडी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली असून महिलांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला आहे. याप्रकरणी अनोळखी दोन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली  माहिती अशी , फिर्यादी वनिता विलास जगदाळे (वय 45, रा. सेवागिरी बंगला, डंगारे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, दहिवडी) या दि. 8 मे रोजी सकाळी सुमारे 11.45 वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलगी श्रेयासह घरात जेवणासाठी बसल्या होत्या. त्यावेळी अचानक दोन अनोळखी इसमांनी घराचे गेट उघडून आत प्रवेश केला. यातील एक इसम कंपाउंडमधील बोलेरो गाडीच्या पाठीमागे लपून बसला, तर दुसरा गेटबाहेर थांबला होता.

दरम्यान, संशय आल्याने वनिता जगदाळे यांनी आरडाओरडा केला असता दोन्ही इसम घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकारानंतर दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 3(5), 305, 329(1), 62 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खांडेकर करीत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *