म्हसवड परिसरात हातभट्टी दारूविरोधात पोलिसांची धडक कारवाई; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड :प्रतिनिधी 

म्हसवड पोलीस ठाण्याच्या पथकाने रविवारी (दि. १० मे) सकाळी म्हसवड परिसरात बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मितीविरोधात सलग कारवाया करत तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू व दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन जप्त करण्यात आले.

पहिली कारवाई शिंदेमळा परिसरातील ओढ्याच्या कडेला करण्यात आली. यावेळी निलेश बाळू जाधव (रा. म्हसवड) याच्या ताब्यातून १०५ लिटर काढीव हातभट्टी दारू तसेच ३५० लिटर आंबट गुळचट वासाचे रसायन असा एकूण १२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर कोडलकरवस्ती परिसरात ओढ्याच्या कडेला छापा टाकून बाबा विठ्ठल चव्हाण (रा. म्हसवड) याच्याकडून १०५ लिटर हातभट्टी दारू व ४७५ लिटर रसायन असा एकूण १४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक १२५/२०२६ नोंद करण्यात आली आहे.

तिसऱ्या कारवाईत कोडलकरवस्ती येथील ओढ्याच्या खालच्या बाजूस सागर वसंत मंडले (रा. म्हसवड) याच्या ताब्यातून ५ लिटर हातभट्टी दारू व २०० लिटर रसायन असा ४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक १२६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

या तिन्ही कारवाया म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अनिल विलास वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आल्या. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (क)(ड)(इ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर. एल. कुंभार करीत आहेत.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *