मराठी फिल्म इंडस्ट्री बचाओ आंदोलनाला दिग्गज कलाकारांचा जाहीर पाठिंबा!

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

मुंबई, प्रतिनिधी गणेश तळेकर :

मराठी चित्रपटसृष्टीचे प्रश्न, कलाकारांचे हक्क आणि चित्रपट उद्योगाच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘मराठी फिल्म इंडस्ट्री बचाओ आंदोलना’ला मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे, अभिनेते विजय पाटकर, जयंत वाडकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी या अभियानाला पाठिंबा दर्शविल्याने आंदोलनाला नवे बळ मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त १ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित ‘सुवर्ण महोत्सवी शुभारंभ’ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाने मराठी चित्रपटसृष्टीतील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला.

मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रश्नांसाठी आंदोलनाची भूमिका आक्रमक

मराठी चित्रपटसृष्टीसमोरील विविध समस्या सोडविणे, उद्योगाचा सर्वांगीण विकास साधणे आणि कलाकारांच्या हक्कांचे संरक्षण करणे, या उद्देशाने ‘मराठी फिल्म इंडस्ट्री बचाओ आंदोलन’ कार्यरत आहे. आंदोलनाचे अध्यक्ष प्रसाद इंगवले यांच्या नेतृत्वाखाली या अभियानाची पुढील दिशा ठरविण्यात येत असून, मराठी चित्रपटसृष्टीच्या हितासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दिग्गज कलाकारांनी दिलेला पाठिंबा हा या अभियानासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. चित्रपटसृष्टीतील प्रश्नांवर व्यापक चर्चा व्हावी आणि संबंधित यंत्रणांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

या वेळी आंदोलनाचे उपाध्यक्ष हर्षल भिसे पाटील, कार्याध्यक्ष सचिन पिंपरीकर यांच्यासह सतीश आंबर्डेकर, सागर खडके, अक्षय क्षीरसागर, श्रीकांत उमरीकर, अमोल निरगुडे, उमेश पंडित, संकेत राऊत, डॉ. भगवान कांबळे, सुनील जाधव, संकेत शिर्के, सुधीर शहाजी उमाप, पुष्पा परते, जान्हवी धिंदळे, रामचंद्र शिवराम साळुंखे, जगदीश चव्हाण, प्रशांत बोगम, स्वप्नील कापसे, मनोज हरिश्चंद्र थोरात, गणेश तळेकर, जितेंद्र वाईकर, रवी भोंगाडे, शामराव पवार, राजू माने, अजय गोपीवार, मनोहर आग्राडे, सीमा अहिरे, भगवान आत्राम, जोसेफ अमोलिक, ज्वाईसी अमोलिक, वैशाली अमोलिक, कृष्णांत खरे, संकेत बने, स्वरा चव्हाण, विजय गायकवाड, धनंजय जाधव, भरत गांगुर्डे, योगेश पंडित, अशोक ढवळे, आशिष देशपांडे आणि समीक्षा गिसरे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठी चित्रपटसृष्टीला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना व्हाव्यात, स्थानिक कलाकारांना अधिक संधी मिळाव्यात आणि चित्रपट उद्योगाच्या विकासाला चालना मिळावी, या अपेक्षांसह आंदोलन पुढे नेण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. दिग्गज कलाकारांच्या जाहीर पाठिंब्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या हितासाठी सुरू असलेल्या या अभियानाला अधिक व्यापक स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *