उंब्रज पोलिसांची कारवाई; २६ हजार ९२० रुपयांचा दारूसाठा जप्त
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
उंब्रज :प्रतिनिधी
भोसलेवाडी (ता. कराड) येथे उंब्रज पोलिसांनी कारवाई करत बेकायदा देशी दारूची वाहतूक करणाऱ्या १९ वर्षीय युवकास ताब्यात घेतले. या कारवाईत देशी दारूच्या २४ बाटल्या आणि दुचाकीसह एकूण २६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवराज दिपक काळे (वय १९, रा. गणेशनगर कोटी, ता. कराड, मूळ रा. काळेवस्ती, मोळाचा ओढा, पो. कोंडवे, ता. जि. सातारा) हा २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भोसलेवाडी गावातील कमानीजवळ उंब्रज ते गणेशनगर कोटी सर्व्हिस रोडवर दुचाकीवरून देशी दारूची वाहतूक करताना आढळून आला.
त्याच्याकडून १८० मिली क्षमतेच्या ‘पहिली धार कृष्णा संत्रा’ लेबल असलेल्या देशी दारूच्या २४ सीलबंद बाटल्या, एक सी.ए. नमुना बाटली तसेच एमएच-११-एव्ही-२००५ क्रमांकाची हिरो होंडा दुचाकी असा एकूण २६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त दारूचे एकूण प्रमाण ४ लिटर ३२० मिली आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल एकनाथ देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उंब्रज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३४२/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पवार (ब.नं. १४५४) करीत आहेत. दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार जगताप यांनी काम पाहिले.

