मार्डी येथे सेवापूर्ती सत्कार सोहळा; शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव होणार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

मार्डी ता. माण (प्रतिनिधी) :
मार्डी केंद्रातील शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या मान्यवरांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या कार्यातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षक व शिक्षण अधिकाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे.

केंद्र समूह मार्डी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सेवानिवृत्त होत असलेल्या शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी बीट मार्डी मा. शमीमबानू दस्तगीर तांबोळी, जि.प. प्राथमिक शाळा मार्डी नं. २ च्या वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ. हेमलता रमेशराव शिंदे, जि.प. प्राथमिक केंद्रशाळा मार्डी नं. १ चे वरिष्ठ मुख्याध्यापक सौ. मालन अशोकराव गंबरे, जि.प. प्राथमिक शाळा भालवडी येथील वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. धनाजी शंकर पोळ तसेच जि.प. प्राथमिक शाळा रांजणीच्या मुख्याध्यापिका सौ. मंगल धनाजी पोळ यांचा समावेश आहे.

या मान्यवरांनी आपल्या सेवाकाळात शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून समाज घडविण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रम शुक्रवार, दि. 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता गजराज मंगल कार्यालय, जाशी पाटी, मार्डी येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यास परिसरातील शिक्षक, शिक्षणप्रेमी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मान्यवरांचा गौरव सोहळा अधिक भव्य करावा, असे आवाहन आयोजक केंद्र समूह मार्डी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील असून, उपस्थितीने कार्यक्रमास अधिक शोभा येणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *