कराड उत्तरमध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या सहअध्यक्षपदी रणजित पाटील

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कराड, प्रतिनिधी :

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या कराड उत्तर विधानसभा क्षेत्राच्या सहअध्यक्षपदी वडगावचे माजी सरपंच तथा भाजप पदाधिकारी रणजित (अप्पा) पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून ही नियुक्ती करण्यात आली असून, आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या शिफारशीनुसार त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला अधिक गती देण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सहअध्यक्षांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून शेतपाणंद व शेतरस्त्यांच्या कामांना गती मिळून ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार आहे.

रणजित पाटील यांनी २०१५ ते २०२० या कालावधीत वडगावचे सरपंच म्हणून काम करताना विविध विकासकामे यशस्वीपणे पूर्ण केली. शेतरस्ते व पाणंद रस्त्यांच्या प्रश्नांचा त्यांना अभ्यास असून, त्यांचा अनुभव या योजनेच्या अंमलबजावणीत उपयोगी ठरणार आहे.

आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या अडचणी जवळून समजणाऱ्या रणजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराड उत्तरमध्ये पाणंद रस्त्यांची कामे अधिक वेगाने पूर्ण होतील.”

नियुक्तीनंतर रणजित पाटील यांनी शासनाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त केली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *