हॉटेल नानाजसमोरून प्लेटिना दुचाकीची चोरी; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, प्रतिनिधी :
शहरातील हॉटेल नानाजसमोर पार्क केलेली बजाज प्लेटिना दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत सुरेश देवकते (वय 23, रा. काळमवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मित्र संतोष महादेव सूळ यांच्या मालकीची बजाज कंपनीची काळ्या रंगाची प्लेटिना (क्र. एमएच 45 यू 5655) ही दुचाकी 12 जून रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान हॉटेल नानाजसमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने संधी साधून सुमारे 50 हजार रुपये किमतीची ही दुचाकी चोरून नेली.
या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 164/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कुंभार करीत आहेत.

