नांदेड जिल्हा बॉक्सिंग संघ निवड चाचणीचे आयोजन
व्हिजन २४ तास न्यूज
उद्धव सरोदे
नांदेड/अर्धापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या यु-२३ आंतर-विभागीय पुरुष व महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी नांदेड जिल्हा बॉक्सिंग संघाची निवड चाचणी गुरुवार, दि. १४ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता सिडको येथील तालुका क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे.
ही राज्यस्तरीय स्पर्धा दि. २३ मे २०२६ रोजी नागपूर येथे होणार असून, त्यासाठी १ जानेवारी २००४ ते ३१ डिसेंबर २००७ या कालावधीत जन्मलेल्या खेळाडूंना सहभाग घेता येणार आहे. पुरुष व महिला गटात विविध वजन गटांमध्ये खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुरुष गटात ४७-५०, ५०-५५, ५५-६०, ६०-६५, ६५-७०, ७०-७५, ७५-८०, ८०-८५, ८५-९० आणि +९० किलो वजन गटांचा समावेश आहे. तर महिला गटात ४५-४८, ४८-५१, ५१-५४, ५४-५७, ५७-६०, ६०-६५, ६५-७०, ७०-७५, ७५-८० आणि +८० किलो वजन गट ठेवण्यात आले आहेत.
सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी दि. १३ मे रोजी रात्री ८ वाजेपर्यंत आपली नोंदणी करणे आवश्यक असून, त्यासाठी ८१८०९०६५८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. निवड चाचणीस उपस्थित राहताना जन्म दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे.
या निवड चाचणीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन नांदेड जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय बनसोडे आणि महासचिव नागराज चावरे यांनी केले आहे.

