राजाच्या बागेत तीनपानी जुगारावर म्हसवड पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड : प्रतिनिधी

म्हसवड शहरातील राजाच्या बाग परिसरात सुरू असलेल्या तीनपानी पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांनी शनिवारी सायंकाळी धाड टाकून तिघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईत जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता राजाच्या बागेतील चिंचेच्या झाडाखाली नारायण विठ्ठल बेंद्रे (वय ५७), सुनील धर्मू पिसे (वय ५०) आणि रमेश नामदेव कवि (वय ५२, सर्व रा. म्हसवड) हे बिगरपरवानाधारक कॅटमधील पत्त्यांवर पैसे लावून तीनपानी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईत ५२ पत्त्यांचा एक कॅट आणि ६०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल युवराज हरिबा खाडे यांच्या फिर्यादीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८८/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई सपोनि संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ए. व्ही. वाघमोडे करीत आहेत.सवड पोलिसांनी शनिवारी सायंकाळी धाड टाकून तिघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईत जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता राजाच्या बागेतील चिंचेच्या झाडाखाली नारायण विठ्ठल बेंद्रे (वय ५७), सुनील धर्मू पिसे (वय ५०) आणि रमेश नामदेव कवि (वय ५२, सर्व रा. म्हसवड) हे बिगरपरवानाधारक कॅटमधील पत्त्यांवर पैसे लावून तीनपानी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईत ५२ पत्त्यांचा एक कॅट आणि ६०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल युवराज हरिबा खाडे यांच्या फिर्यादीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८८/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई सपोनि संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ए. व्ही. वाघमोडे करीत आहेत.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *