कै. रोहित बाबर स्मृती चषक २०२६ : म्हसवडमध्ये भव्य हाप पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड | प्रतिनिधी

कै. रोहित बाबर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट रोजी म्हसवड येथे भव्य हाप पिच एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Oplus_16908288

देवापूरचे सुपुत्र व पश्चिम महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेटमधील आक्रमक फलंदाज म्हणून ओळख असलेले कै. रोहित बाबर यांनी आपल्या अष्टपैलू खेळामुळे मोठा चाहतावर्ग आणि मित्रपरिवार निर्माण केला होता. मात्र, २२ जून २०२६ रोजी अल्पशा आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृती कायम जपण्यासाठी मित्रपरिवाराने ही स्पर्धा आयोजित करून त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५ हजार रुपये (श्री ज्वेलर्स, प्रा. अरविंद पिसे), द्वितीय पारितोषिक १० हजार रुपये (श्री परेशभाई व्होरा – चेतना बाजार), तृतीय पारितोषिक ६ हजार रुपये (श्री मानसिंग खाडे), चतुर्थ पारितोषिक ४ हजार रुपये (श्री रावसो सरतापे) आणि पंचम पारितोषिक ३ हजार रुपये (श्री फारूकभाई काझी) ठेवण्यात आले आहे. तृतीय पारितोषिकाची ट्रॉफी मृगेंद्र शिंदे सर यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण श्री. ओंकार काटकर (रिद्धी उद्योगसमूह) व श्री. नितीन केवटे यांच्या सहकार्याने होणार असून मंडप व साऊंड सिस्टमची व्यवस्था ॐ इव्हेंटचे श्री. महेश सोनवले यांनी केली आहे.

सामने गावनिहाय पद्धतीने खेळविण्यात येणार असून प्रथम नोंदणी करणाऱ्या १६ संघांना प्राधान्य दिले जाणार आहे. सर्व खेळाडूंना ट्रॅक पँट, टी-शर्ट, शूज व आधार कार्ड बंधनकारक राहील. वेळेत उपस्थित न राहणाऱ्या संघांना दंड करण्यात येईल तसेच सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *