दहिवडी पोलिसांची अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई
व्हिजन २४ तास न्यूज
दहिवडी :-प्रतिनिधी
दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर आळा घालण्याच्या उद्देशाने आज दिनांक 15/11/2026 रोजी दहिवडी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून एकाच दिवशी एकूण ६ ठिकाणी छापे टाकून अवैध धंद्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे.
सदर कारवाईमध्ये एकूण 06 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्यान्वये 06 गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण रुपये 6112 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक, सातारा, निखिल पिंगळे सो मा. अपर पोलीस अधीक्षक, सातारा सुरज गुरव सो व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत व प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी सो यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस स्टेशनच्या सपोनी रघुनाथ शिंदे व ASI खाडे, ASI हांगे, HC खांडेकर,HC खाडे व गुन्हे शोध पथक यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
दहिवडी पोलीस स्टेशनकडून अवैध धंद्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असून, पोलीस स्टेशन हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू दिले जाणार नाहीत.
नागरिकांना आवाहन : दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत कोठेही अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल.

