माणदेशाच्या डिजिटल क्रांतीचा शुभारंभ; SBDB चे दोन नवीन अॅप्स आज होणार लॉन्च! म्हसवडमध्ये आज प्रकाशन सोहळा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज

म्हसवड :प्रतिनिधी 

माणदेशातील ग्रामीण आणि शहरी भागातील व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, महिला उद्योजक आणि युवकांना डिजिटल बाजारपेठेशी जोडण्याच्या उद्देशाने SBDB – SALE BUY DID BID (SBDB Rural and Urban Connecting Pvt. Ltd.) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ आज रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी म्हसवड येथे होत आहे. या उपक्रमांतर्गत दोन स्वतंत्र अॅप्सचे प्रकाशन करण्यात येणार असून, माणदेशाच्या डिजिटल व्यवसाय क्षेत्रात नवी संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या सोहळ्यात Vendor Partner App आणि Delivery Partner App या दोन अॅप्सचे अनावरण करण्यात येणार आहे. या अॅप्सच्या माध्यमातून स्थानिक दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी आणि उद्योजकांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच डिलिव्हरी पार्टनर्सनाही रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

विशेष म्हणजे, माण तालुक्यातील गावोगावी SBDB प्रतिनिधी (Area Lead) नियुक्त करणे तसेच विविध गावांमध्ये कुरिअर कार्यालये उभारण्याची संकल्पना या कार्यक्रमातून मांडण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहक, स्थानिक दुकानदार आणि व्यावसायिक यांना डिजिटल माध्यमातून एकमेकांशी जोडण्याचा मार्ग खुला होणार आहे.

ग्रामीण भागातील व्यापाराला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक व्यवसायांना अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि गावागावांतील आर्थिक व्यवहारांना डिजिटल स्वरूप देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

हा प्रकाशन सोहळा रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता SBDB कार्यालय, बापूजी निवास, नवीन पोस्ट ऑफिसजवळ, पंढरपूर-सातारा रोड, म्हसवड येथे आयोजित करण्यात आला आहे.

‘नवीन वर्ष, नवा व्यापार; प्रत्येक गाव डिजिटल बाजार! माणदेशातून डिजिटल भारताकडे!’ या संकल्पनेतून सुरू होणाऱ्या या उपक्रमामुळे माणदेशातील व्यापार आणि रोजगार क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

या उपक्रमाचे संस्थापक सोहम शिर्के यांनी या कार्यक्रमासाठी संपादक, पत्रकार बांधव तसेच नागरिकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८३२९०९३९१९

SBDB – Connecting Villages, Businesses & Opportunities.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *