सेवाभाव वृत्तीने शासकीय सेवेत प्रवीण येवले यांनी केलेले कार्य समाजासाठी आदर्शवत…. श्रीरंग काटेकर
व्हिजन २४ तास न्यूज
श्रीरंग काटेकर
सातारा : प्रतिनिधी
सेवाभाव व सामाजिक दायित्वतेच्या भूमिकेतून प्रवीण उर्फ तात्या येवले यांनी केलेले कार्य समाजासाठी आदर्शवत ठरले आहे असे मत गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले, ते सातारा येथील पत्रकार भवन येथे प्रवीण उर्फ तात्या येवले हे मुंबई येथील सह धर्मादाय आयुक्त कार्यालय मुंबई येथून निरीक्षक पदावरून निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन उचित सत्कार जनहक्क क्रांति मंच सातारा यांच्या वतीने घेण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, चार्टर्ड अकाउंटंट कल्याण जगताप,जनहक्क क्रांती मंचाचे अध्यक्ष सुशांत मोरे,महारुद्र तिंकुडे,किरण कदम, नंदकुमार सावंत, शिवाजी जाधव, यशवंत पाटणे, गुलाब बनसोडे,भरत रावळ विविध सामाजिक संस्था, संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की, सामाजिक संवेदनशीलता जर मनात असेल तर शासकीय कार्यालयातील कामे सहजतेने मार्गी लागतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रवीण उर्फ तात्या येवले हे आहेत.
माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे म्हणाले की, प्रवीण उर्फ तात्या येवले यांनी शासकीय सेवेत प्रदीर्घ कामकाज करताना केलेली निष्ठेपूर्वक तसेच प्रामाणिकपणे केलेली सेवा कायमस्वरूपी स्मरणात राहील हे निश्चित.
जनहक्क क्रांती मंचाचे अध्यक्ष सुशांत मोरे म्हणाले की, शासकीय कार्यालय मधील कामे विशेषता धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कामे करतांना अचूक मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये नेहमीच प्रवीण उर्फ तात्या येवले यांनी अनेकांना योग्य मार्गदर्शन दिल्यामुळे सामाजिक संस्थां व संघटनाचे अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. सेवाकाळात त्यांनी लोकांच्या न्याय प्रश्नाला प्राधान्य देऊन खऱ्या अर्थाने शासकीय सेवेत असतानाही सामाजिक कार्य करून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिंकुडे म्हणाले की, संस्थांचे ऑडिट व चेंज रिपोर्ट सादर करताना बऱ्याचदा अनेक त्रुटी राहत असत अशा प्रसंगी संबंधितांना अचूक कायदेशीर मार्गदर्शन करून त्यांनी अनेक संस्थांना नवसंजीवनी दिली आहे.
प्रारंभी प्रविण उर्फ तात्या येवले व त्यांच्या धर्मपत्नी उषा येवले यांना विविध संस्थांकडून पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
चौकट ….. शासकीय सेवेतून विशेषता सह धर्मादाय आयुक्त कार्यालयातून सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्तींचा सामाजिक संस्थांकडून सत्कार व गौरव होणे ही दुर्मिळ बाब आहे. अर्थात प्रवीण उर्फ तात्या येवले यांनी शासकीय सेवेत असताना समाजासाठी केलेल्या त्याग व निष्ठापूर्वक कार्याची दखल जनहक्क क्रांती युवा मंच सारख्या सामाजिक संस्थेने घेऊन केलेला त्यांचा उचित सत्कारातच त्यांचे कार्यकर्तृत्व दिसून येत आहे. तीस वर्षाच्या अखंड सेवेत निरपेक्ष भावनेने केलेल्या कामाचाच हा खरा गौरव असल्याचे मत प्रवीण उर्फ तात्या येवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी केले. प्रास्ताविक सुशांत मोरे यांनी केले तर आभार किरण कदम यांनी मानले.

