दहिवडी पोलिसांची अवैध दारूविक्रीवर धडक; तीन ठिकाणी छापे, ५,६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त
व्हिजन २४ तास न्यूज
दहिवडी (प्रतिनिधी):
माण तालुक्यातील कुळकजाई, सोकासन आणि पिंगळी बुद्रुक येथे सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर दहिवडी पोलिसांनी धडक कारवाई करत तीन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत देशी-विदेशी दारूचा ५,६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांना संबंधित गावांमध्ये अवैध दारूविक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या स्वतंत्र पथकांनी एकाचवेळी कारवाई केली.
कुळकजाई येथील घाडगेवस्ती परिसरातून मयूर मल्हारी जगताप (वय १९, रा. उपळवे, ता. फलटण) याच्या ताब्यातून ३,८५० रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. सोकासन येथे चकुलाल विठ्ठल जाधव (वय ३७, रा. सोकासन) हा घराच्या आडोशाला अवैध दारूविक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ९६० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच पिंगळी बुद्रुक येथील न्यू सम्राट ढाब्याजवळ योगेश भाऊ पवार (वय ४०, रा. पिंगळी बुद्रुक) याच्या ताब्यातून ८०० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
या तिन्ही कारवायांमध्ये मिळून ५,६१० रुपयांचा अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला असून तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खाडे, महिला पोलीस हवालदार दया डोईफोडे, पोलीस हवालदार तानाजी काळे, बापुसाहेब खांडेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुहास गाडे, ओमकार साळुंखे, गणेश खाडे, सहदेव साबळे आणि सागर लोखंडे यांनी सहभाग घेतला

