लग्नाचे आमिष, फोटो व्हायरलची धमकी; तरुणीवर वारंवार अत्याचार, दोघे आरोपी अटकेत

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड (प्रतिनिधी):

लग्नाचे आमिष दाखवून तसेच जेजुरी येथे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी म्हसवड पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जून ते 13 जुलै 2026 या कालावधीत माण तालुक्यातील पर्यंती गावातील फिर्यादीच्या राहत्या घरी तसेच पुणे–जेजुरी मार्गावर मारुती स्विफ्ट (एमएच-53-बी-0546) कारमध्ये ही घटना घडल्याचा आरोप आहे. मुख्य आरोपी नागेश महादेव खांडेकर (रा. खडकी, ता. माण, जि. सातारा) याने लग्नाचे आमिष दाखवून व जेजुरी येथे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, योगेश कर्चे याच्या मदतीने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तसेच ही बाब कोणालाही सांगितल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 199/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह पोक्सो कायद्याच्या कलम 4, 6, 8, 12 व 17 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *