म्हसवडमध्ये मध्यरात्री वाळू चोरीवर कारवाई; आरोपीसह वाहन जप्त

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड (ता. माण, जि. सातारा) :

अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात म्हसवड पोलिसांनी रविवारी मध्यरात्री कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. 26 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 12:05 वाजण्याच्या सुमारास म्हसवड ते शेंबडेवस्ती रस्त्यालगत, मेरीमाता हायस्कूलच्या पाठीमागील माणगंगा नदी पात्रात ही कारवाई करण्यात आली. या वेळी अभिषेक अरुण सावंत (वय 26, रा. दिवड ता. माण) हा इसम विनापरवाना वाळू उत्खनन करून ती वाहतूक करताना आढळून आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून अंदाजे अर्धा ब्रास वाळू (किंमत सुमारे 5,000 रुपये) तसेच पांढऱ्या रंगाची टाटा इंट्रा V50 ही गाडी (किंमत सुमारे 5 लाख रुपये) जप्त करण्यात आली आहे. संबंधित वाहनावर नंबर प्लेट नसल्याचेही आढळून आले.

या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 99/2026 अन्वये BNS कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल राहुल राजेंद्र थोरात यांनी दिली आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. जी. हांगे यांनी तपास सुरू केला असून आरोपीस नोटीस बजावण्यात आली आहे.

सदर घटनेनंतर परिसरातील अवैध वाळू उत्खननाविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून पुढील तपास सुरू आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *