तासवडे एमआयडीसीतील उद्योजकांसोबत तळबीड पोलिसांची समन्वय बैठक उत्साहात संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते 

कराड तळबीड प्रतिनिधी

उपविभागीय पोलीस अधिकारी कराड श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तासवडे एमआयडीसी परिसरातील उद्योजकांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली.

तळबीड पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित या बैठकीत उद्योग परिसरातील कायदा व सुव्यवस्था, उद्योगांची सुरक्षा, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, कामगार व सुरक्षा रक्षकांची पडताळणी, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम ठेवणे, संशयास्पद व्यक्ती अथवा हालचालींची तात्काळ पोलीसांना माहिती देणे, वाहतूक शिस्त तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच उद्योग परिसरात घडणाऱ्या कोणत्याही गुन्हेगारी प्रकारास प्रतिबंध करण्यासाठी पोलीस व उद्योजक यांनी परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे सांगून, कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तात्काळ तळबीड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी उपस्थित उद्योजकांनी त्यांच्या उद्योगांशी संबंधित सुरक्षा विषयक अडचणी व सूचना मांडल्या. पोलीस विभागाने त्या सकारात्मकपणे ऐकून आवश्यक ती कार्यवाही व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीस तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस अधिकारी API /रविंद्र भोरे, पोलीस हवालदार उत्तम कोळी, पोलीस नाईक कुलदीप कोळी, पोलीस अंमलदार अभय मोरे तसेच तासवडे एमआयडीसी विभागातील अधिकारी श्री कोळेकर, ढवळे व विविध औद्योगिक आस्थापनांचे उद्योजक व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस व उद्योग क्षेत्रातील समन्वय अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत उपयुक्त ठरली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *