वारकऱ्याची सेवा हीच पांडुरंगाची सेवा……… उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 
म्हसवड… प्रतिनिधी
      पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या आषाढी वारीमधील लाखो वारकऱ्यांची सेवा हीच खरी पांडुरंगाची सेवा असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी म्हसवड तालुका माण येथे केले.
      आषाढी वारी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूरकडे येणाऱ्या विविध दिंड्यामधील वारकऱ्यांच्या सोयी सुविधा बाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथजी शिंदे यांनी म्हसवड येथे इंचगिरी पांडुरंग महाराज रसाळ सांप्रदायाच्या पायी दिंडीला चांदणी चौक म्हसवड येथे भेट देऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले. पंढरपूर सातारा मार्गावरील विविध दिंड्या व त्यामधील वारकऱ्यांच्या सोई सुविधेचा आढावा घेण्यासाठी नामदार एकनाथ शिंदे यांचा धावता दौरा आयोजित केला होता. म्हसवड चांदणी चौक येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या इंचगिरी सांप्रदायाच्या पांडुरंग रसाळ महाराज यांच्या नेतृत्वाखालील दिंडीला नामदार एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट घेऊन महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, रसाळ महाराज दिंडीतील पदाधिकारी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     यावेळी बोलताना नामदार एकनाथ शिंदे म्हणाले मी पांडुरंगाचा भक्त आहे. इंचगिरी रसाळ महाराज संप्रदाय दिंडीला खूप मोठा वारसा आहे. मठाधिपती पांडुरंग महाराज रसाळ यांनी महाराजांचा वसा आणि वारसा अनेक वर्षापासून जपला आहे. हा वारसा ह भ प तुकाराम महाराज रसाळ व ह भ प दिनेश भैय्या रसाळ यांनी ताकतीने पुढे चालवावा व पांडुरंगाने त्यांना शक्ती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
     या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या भावनिक व आध्यात्मिक आठवणीचे स्मरण केले.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्म, पांडुरंगावरील श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. 24 तासाच्या कामकाजातील ताणतणाव दूर करण्यासाठी परमेशरावरील श्रद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि हीच श्रद्धा आषाढी वारीतील विविध दिंडी मधून येणाऱ्या लाखो भाविकां कडून व्यक्त होत आहे. मी स्वतःला नेता किंवा पुढारी मानत नाही. खऱ्या अर्थाने मी तुमचा सेवक आहे आणि ही संधी मला पांडुरंगाने दिलेली आहे. कायम तुमच्या ऋणात राहणे , तुम्हाला सहकार्य करणे हे माझे कर्तव्य असल्याचे भावनिक उदगार शिंदे यांनी काढले.
या धावत्या दौऱ्याच्या निमित्ताने नामदार शिंदे यांनी प्रशासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, तसेच निवास व्यवस्था इत्यादी बाबत आढावा घेतला. या निमित्ताने दिंडी मालक, व्यवस्थापक व वारकऱ्याशी संवाद साधून तुमच्या प्रत्येक अडचणीत मी सक्रिय व दक्ष असल्याची हमी त्यांनी दिली. तसेच वारकरी व गुरु भक्तांना मोलाचे मार्गदर्शन केले.
      इंचगिरी रसाळ दिंडी तर्फे शंकर महाराज रसाळ यांनी एकनाथ शिंदे यांचा पुष्पहार देऊन सन्मान केला. ह भ प दिनेश भैय्या रसाळ म्हणाले हल्लीच्या लोकशाहीतील विष्णूचा अवतार म्हणजे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होय. पंढरीचा पांडुरंग शिंदे साहेबांच्या पाठीशी असून त्यांचे आगामी राजकीय भविष्य उज्वल असल्याचे दिनेश भैय्या यांनी स्पष्ट केले.
चौकट……. ऑन दि स्पॉट डिसिजन….
मी वारकऱ्यांचा सेवक आहे. दिंडी व्यवस्थापना संदर्भातील तुमची कोणतीही अडचण सांगा. करतो, बघतो म्हणणारा मी पुढारी नाही. चांगल्या कामासाठी नो रीजन,ऑन दि स्पॉट डिसिजन ही माझी कामाची पद्धत आहे. एकदा या, भेट आणि पहा असे सांगून दिंडीच्या अडचणी बाबत समक्ष भेटण्याचे आश्वासन त्यांनी रसाळ संप्रदायांना दिले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *