म्हसवडचे सचिन नवगण यांना अमरावती येथे ‘समाजसेवा शिरोमणी’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड, प्रतिनिधी :

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा विधाता सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन बापूराव नवगण यांना अमरावती येथे आयोजित भव्य राष्ट्रीय सोहळ्यात ‘समाजसेवा शिरोमणी’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

 

अखिल भारतीय संत चेतना महाकुंभ, प्रकृती-आध्यात्म समागम तसेच २४ व्या अखिल भारतीय प्रतिभा महासम्मेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री संत प.पू. कृष्णकांत महाराज (हरिद्वार), ओम शांती प्रजापिता ब्रह्मकुमारीजच्या परमपूज्य सीतादेवी (माउंट आबू) तसेच ज्ञान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. क्रांती महाजन यांच्या हस्ते सचिन नवगण यांचा सन्मान करण्यात आला.

Oplus_16908288

या राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यात देशातील विविध राज्यांतील संत, समाजसेवक, सैनिक, कला, क्रीडा, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाबद्दल सचिन नवगण यांची विशेष दखल घेण्यात आली.

शांत, संयमी आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या नवगण यांनी विधाता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वारकरी सेवा, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, पर्यावरण संवर्धन, रस्ता सुरक्षा जनजागृती तसेच आपत्तीग्रस्तांना मदत अशा अनेक लोकहिताच्या उपक्रमांत मोलाचे योगदान दिले आहे.

यापूर्वी त्यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने ‘महाराष्ट्र गौरव सन्मान २०२६’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावरील ‘समाजसेवा शिरोमणी’ पुरस्कार प्राप्त झाल्याने म्हसवडसह सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन शेठ दोशी, नगरसेवक अकील काझी,नासप जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे,कृषिरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर, पत्रकार विजय टाकने, अहमद मुल्ला, सचिन मंगरुळे, शहाजी लोखंडे,मा. नगरसेवक सूरज ढोले, परेश व्होरा,निहाल काझी,यासिन तांबोळी, प्रीतम तांबे महम्मद शेख, शिवशंकर डमकले,अहिंसा बँकेचे नीरज व्होरा,शारुख तांबोळी, लक्ष्मण लोहार,धनराज सरतापे, चैतन्य, योगी जगन्नाथ लोहार, शिवकुमार डोंबे, नंदकुमार साखरे, प्रवीण भोसले, दाऊद मुल्ला, दीपक तावरे, राजू गोंजारी, सर्फराज काझी, अजहर काझी, माजी नगरसेवक अंगुली बनसोडे, धनंजय कालेकर,आदी , मान्यवर आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *