म्हसळ्याच्या राजकारणात सुनील तटकरेंची ‘मास्टरस्ट्रोक’; सुफियान हळदे यांची माघार आणि सुनील शेडगे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड!

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसळा : सुशील यादव

    म्हसळा नगरपंचायतीच्या राजकारणाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले असतानाच, आज एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) सुफियान हळदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेडगे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या विजयामुळे खासदार सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय धुरंदरता सिद्ध केली आहे.
       २७ मे २०२६ रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, दुपारी १:४५ च्या सुमारास सुफियान हळदे यांनी अनपेक्षितपणे आपली माघार घेतली. शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील शेडगे यांचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या संपूर्ण घडामोडींमागे सुनील तटकरे यांची राजकीय खेळी यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.

          महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आणि स्थानिक समीकरणांसाठी ही माघार महत्त्वाची मानली जात आहे. सुनील शेडगे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा १ जून २०२६ रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल.
     यापूर्वी म्हसळ्यात कधी वरिष्ठांचे आदेश धुडकावत निवडणुका लढल्या गेल्या, तर कधी चार दिवसांत राजीनामे देण्याचे प्रकार घडले होते. मात्र, आजच्या या निर्णयामुळे म्हसळ्याच्या राजकारणाला आता स्थिर वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *