नाईकबोमवाडी येथे वेताळ बाबा यात्रा व शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रमांचा उत्साहपूर्ण आयोजन
व्हिजन २४ तास न्यूज
फलटण (प्रतिनिधी) :
नाईकबोमवाडी येथे वेताळ बाबा यात्रेनिमित्त तसेच जयंतीच्या औचित्याने ररणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. जय शिवाजी युवा मंडळ, नाईकबोमवाडी यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशाली संदीप कांबळे, पंचायत समिती सदस्या सौ. विजया हनुमंत सोनवलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच कार्यकर्ते श्री. अजय चव्हाण, श्री. धीरज चव्हाण, श्री. गणेश चव्हाण, श्री. पिसाळ ढमाल, श्री. रणजीत घाडगे, श्री. सौरभ पवार, श्री. दयानंद घाडगे, श्री. शुभम चव्हाण, श्री. रोहन ढमाळ, सौ. मनीषा चव्हाण, श्री. कमल चव्हाण, सौ. शालन घाडगे, सौ. जया पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात ह.भ.प. श्री. रविकुमार ठावरे-पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले. तसेच संस्थेच्या वतीने ‘राजमुद्रा (शिवमुद्रा) बंधन’ वाटप करण्यात आले. यात्रेनिमित्त नागरिकांसाठी पाणी बिस्कीट व अल्पोपहाराचेही वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा रझिया शेख, श्री. इम्रान सिकंदर सय्यद, उपाध्यक्ष श्री. अतुल शाह, खजिनदार श्री. कैफ शेख, सचिव श्री. मारुती टकले, कर्मचारी संचालिका तथा मुख्याध्यापिका शाहीन शेख, सौ. माया बनसोडे, विद्यानगर शाळेचे उपशिक्षक चव्हाण सर, संचालिका सौ. प्रीती शाह, सौ. हिना सय्यद, सौ. अनिसा सय्यद तसेच डिजिटल मीडिया संस्थेचे पदाधिकारी, संचालक-संचालिका व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला असून सर्वांच्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

