लातूर येथे बहुजन पत्रकार संघाची बैठक, नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती*
व्हिजन २४ तास न्यूज
विशाल सूर्यवंशी
लातूर : प्रतिनिधी
येथील शासकीय विश्रामगृहात आज बहुजन पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष संजय उधारे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या निवडीमध्ये लातूर नगरी न्यूज चे मुख्य संपादक विशालभाऊ सूर्यवंशी यांची प्रदेशाध्यक्षपदी, ग्रामीण वार्ता पत्र न्यूज चे मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी यांची प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली. तसेच मराठवाडा अध्यक्षपदी रमण बेंबडे यांची नियुक्ती करण्यात आली. लाईव्ह ऑल इंडिया पोलिस टाईम्स न्यूज चे सुखदेव राठोड यांची जिल्हा सचिवपदी निवड झाली.
या कार्यक्रमास वाय पी न्यूज चे रवी बिजलवाड, जिल्हाध्यक्ष अमोल घायाळ तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पत्रकारांवर होणाऱ्या वाढत्या प्राणघातक हल्ल्यांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. विशेषतः साप्ताहिक, युट्युब व पोर्टल माध्यमातील पत्रकारांना शासकीय मानधन मिळावे यासाठी बहुजन पत्रकार संघ सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बहुजन पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

