बार्शीत २९ वर्षीय तरुणाचा गळफास घेऊन मृत्यू

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

बार्शी : प्रतिनिधी

बार्शी तालुक्यातील कांदलगाव येथील शुभम रामदास मुकटे (वय २९) या तरुणाचा अज्ञात कारणातून गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजल्यापासून दि. १४ सप्टेंबर रोजी पहाटे १.२५ वाजण्याच्या दरम्यान घडली.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम मुकटे यांनी त्यांच्या राहत्या घरात अज्ञात कारणातून गळफास घेतला. त्यानंतर त्यांना मयत अवस्थेत बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दि. १४ सप्टेंबर रोजी पहाटे १.२५ वाजता त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालयाकडून पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ अन्वये पुढील कार्यवाही सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी राखून ठेवण्यात आला आहे.

प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या आदेशाने या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक चौधरी करीत आहेत. तरुणाने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *