कुंभारगांव येथे समाजसेवा शिबिर संपन्न…
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गणेश मिंड
इंदापुर प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाचे , लोकनेते शरदचंद्रजी पवार शिक्षणशास्त्र महाविद्यालय (बी. एड्.) भिगवण आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत प्रात्यक्षिक कार्याचा भाग म्हणून ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येते . म्हणूनच रविवार दिनांक २२/१२/२०२४ रोजी कुंभारगाव येथे समाजसेवा शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ उज्ज्वला लोणकर , कुंभारगावच्या सरपंच सौ दिपाली राहूल भोई , उपसरपंच सौ स्वाती उदय भोईटे यांच्या हस्ते करण्यात आले .
कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली . स्वागतगीतानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले . बागल कुणाल या छात्राध्यापकाने प्रास्ताविक करताना स्वच्छतेतून समृद्धीकडे याचे महत्त्व सांगितले . तसेच शिबिरामध्ये सहभागी होताना खूप आनंद होत असल्याचे नमूद केले .
छात्राध्यापक प्रतिनिधी मनोगत व्यक्त करताना रूपाली हगारे हिने संत गाडगेबाबा महाराज यांच्या विषयी माहिती दिली .
प्रा . बाळकृष्ण सकट सर यांनी शिबिरामध्ये सहभागी सर्व मान्यवर व विद्यार्थी यांचे मनापासून आभार व्यक्त करत शिबिराचा उद्देश व महत्त्व सांगितले . ग्रामस्वच्छता , वृक्षारोपण , व्यसनमुक्ती , अंधश्रद्धा निर्मुलन , पक्षी निरीक्षण इत्यादी उपक्रम राबविणार असल्याचे सांगताना शिबिरासाठी सहकार्य केलेल्या ग्रामस्थ व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार मानले .

सौ दिपाली राहूल भोई सरपंच यांनी सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना शिबिरासाठी शुभेच्छा देत आमचे गाव आपल्या सर्व उपक्रमांना पूर्णपणे सहकार्य देईल अशी ग्वाही देत,
सौ स्वाती उदय भोईटे उपसरपंच यांनी बोलताना व्यक्त केले की , शिबिराचे आयोजन करून लोकनेते शरदचंद्रजी पवार शिक्षणशास्त्र महाविद्यालय (बी. एड्.) भिगवण यांनी आम्हाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली याबद्दल आभार मानले महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.उज्ज्वला लोणकर मॅडम यांनी भिगवण शिक्षण प्रसारक मंडळ व लोकनेते शरदचंद्रजी पवार शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या आज पर्यंतच्या प्रवासाची माहिती देत सामाजिक बांधिलकी व समाजाभिमुख उपक्रमांची अंमलबजावणी वारंवार केली जाते हे नमूद केले . सर्व विद्यार्थ्यांना सूचना देऊन प्रभावीरीत्या शिबिर पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या .
यावेळी उपस्थित ग्रामस्थ , छात्राध्यापक व कुंभारगावातील मान्यवर मंडळी यांनी ग्रामस्वच्छता दिंडीत सहभागी होत जनजागृती व लोकसंस्कृतीची जोपासना करण्यासाठी घोष वाक्यांचे नारे दिले . काहींनी लोक जागरण गीतं तर काहींनी लोकसंस्कृती विकसीत करण्यात वाटा उचलणाऱ्या कथांचे सादरीकरण केले .
लक्ष्मी देवी परिसरात ग्राम स्वच्छता दिंडी पोहचल्यानंतर लोकनेते शरदचंद्रजी पवार शिक्षणशास्त्र महाविद्यालय बी एड् भिगवण यांच्या वतीने गट क्रमांक १ यांनी अंधश्रद्धा निर्मूलन तर गट क्रमांक २ यांनी व्यसनमुक्ती या सामाजिक विषयांवर पथनाट्य सादर करत मनोरंजनातून जनजागृती केली .


