म्हसवडमध्ये 28 जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड, प्रतिनिधी :

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसवड यांच्या वतीने रविवार, दि. 28 जून 2026 रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा शासकीय आरोग्य संस्थेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत.

या मोहिमेत तालुक्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसवड यांनी केले आहे. “दोन थेंब जीवनाचे, पोलिओमुक्त भारताचे” हा संदेश देत पालकांनी आपल्या पाल्यांना वेळेत लसीकरणासाठी आणावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक पालकाने सहकार्य करावे आणि 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब आवर्जून पाजावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *