गोंदवलेत कल्याण मटका अड्ड्यांवर पोलिसांचा धडक छापा संयुक्त कारवाईत ₹६,७०४ रोख व जुगार साहित्य जप्त; दोघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

दहिवडी | प्रतिनिधी :

दहिवडी पोलीस स्टेशन आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत माण तालुक्यातील गोंदवले येथे सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यांवर धडक छापा टाकला. या कारवाईत ₹६,७०४ रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर गोंदवले येथील बाजार पटांगण परिसर तसेच वैभव चौकातील गणोबा वडापाव सेंटर शेजारी सुरू असलेल्या बेकायदेशीर कल्याण मटका व्यवसायावर छापा टाकण्यात आला.

या कारवाईत जितेंद्र मारुती रणपिसे (रा. गोंदवले बु., ता. माण) याच्याकडून ₹३,००२ रोख रक्कम व जुगार साहित्य, तर सुरेश किसन कट्टे (रा. गोंदवले बु., ता. माण) याच्याकडून ₹३,७०२ रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. दोघांविरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार मनोज जाधव, सचिन साळुंखे, राजू कांबळे, रविंद्र खाडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

बेकायदेशीर जुगार व्यवसायाविरोधातील ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *