नंदलापूर ते पाचवड सर्विस रोड खड्डेमय; महामार्ग प्राधिकरणाचे गंभीर दुर्लक्ष

बातमी Share करा:

व्हिजन २४तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते, कराड

कोल्हापूर नाका ते नंदलापूर फाटा या दरम्यान सहापदरी पुलाचे काम सुरू असतानाच नंदलापूर ते पाचवड फाटा या सर्विस रोडची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावरील खड्डे इतके प्रचंड झाले आहेत की रोज किमान पाच अपघात घडत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

घोगाव, टाळगाव परिसरातील चाकरमानी दररोज कराडमध्ये नोकरीसाठी ये-जा करतात. विशेषतः रात्रीच्या वेळी व पावसाळ्यात परिस्थिती भीषण बनते. मोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार तर नेहमीच धोक्यात येतात, इतकेच नव्हे तर चारचाकी वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.

नागरिकांचा प्रश्न असा आहे की – महामार्ग प्राधिकरण हे खड्डे भरून काढण्याऐवजी एखादा जीव गमवावा लागल्यानंतरच हालचाल करणार का? या गंभीर दुर्लक्षामुळे संतापाची लाट उसळली असून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी होत आहे.

महामार्ग प्राधिकरणाने त्वरीत लक्ष न दिल्यास नागरिक तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहेत.

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *