मराठी नाट्यव्यावसायिक निर्माता संघाच्या अध्यक्षपदी राहुल भंडारे
व्हिजन २४ तास न्यूज
गणेश तळेकर
मुंबई, दि. १० :प्रतिनिधी
मराठी नाट्यव्यावसायिक निर्माता संघ, मुंबईच्या ऑगस्ट २०२६ ते जुलै २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली. दादर येथील श्री. शिवाजी मंदिराच्या बोर्ड रूममध्ये झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली.
संघाच्या अध्यक्षपदी राहुल भंडारे, उपाध्यक्षपदी ज्ञानेश महाराव, प्रमुख कार्यवाहपदी श्रीकांत तटकरे, कोषाध्यक्षपदी संदीप विचारे, सहकार्यवाहपदी अजय विचारे आणि सहकोषाध्यक्षपदी प्रिया पाटील यांची निवड झाली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून अशोक नारकर, प्रदीप कबरे, दिपक नलावडे, संतोष पवार आणि शेखर दाते यांची निवड करण्यात आली. तसेच उदय धुरत, नवनाथ (प्रसाद) मच्छिंद्र कांबळी आणि संतोष भरत काणेकर यांची सल्लागार मंडळावर एकमताने निवड झाली.
नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करून, आगामी पाच वर्षांत मराठी नाट्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच नाट्यव्यावसायिकांच्या हितासाठी संघ सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

