गोंदवले खुर्दमध्ये कराटे बेल्ट परीक्षा उत्साहात; प्रेरणा गायकवाड ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॅनने सन्मानित

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

सादिक शेख 

गोंदवले खुर्द, प्रतिनिधी :

 ओकिनावा मार्शल आर्ट अकॅडमीच्या वतीने गोंदवले खुर्द येथे रविवारी (दि. १२) कराटे बेल्ट परीक्षा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विविध स्तरांवरील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने कौशल्याचे सादरीकरण करत परीक्षेत सहभाग नोंदवला.

  परीक्षेसाठी ग्रँडमास्टर आप्पा जाधव (ब्लॅक बेल्ट सिक्स डॅन), विनोद माटे (ब्लॅक बेल्ट थर्ड डॅन), विजयकुमार अवघडे (ब्लॅक बेल्ट सेकंड डॅन), सादिक शेख (ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॅन) आणि आदिनाथ शिंदे (ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॅन) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

       उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विकास गायकवाड यांची कन्या कु. प्रेरणा गायकवाड हिला ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॅन पदवी प्रदान करण्यात आली, तर चि. वसीम शेख याला ब्राऊन बेल्ट देऊन गौरविण्यात आले.

  कार्यक्रमाला गोंदवले खुर्दचे माजी सरपंच अजितराव पोळ (दादा) यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत कराटेसारख्या आत्मसंरक्षण कलेचे महत्त्व अधोरेखित केले आणि प्रत्येक विद्यार्थ्याने शिस्त, आत्मविश्वास व जिद्दीच्या बळावर प्रगती करावी, असे आवाहन केले.

परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे ओकिनावा मार्शल आर्ट परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अजिंक्य अवघडे, समीक्षा शेडगे तसेच सर्व प्रशिक्षक व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *