चिरंजीव परफेक्ट बिघडलाय !’ नाटकाचा शतकी प्रयोग उत्साहात साजरा
व्हिजन २४ तास न्यूज
गणेश तळेकर
मुंबई (प्रतिनिधी):
मराठी रंगभूमीवर सध्या गाजत असलेले ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ हे नाटक अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस उतरले असून, या नाटकाने नुकताच १०० प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर या नाटकाचा शतकी प्रयोग मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या विशेष प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेते , अभिनेत्री , अभिनेते , अभिनेत्री , अभिनेते आणि अभिनेत्री यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कलाकारांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना अशोक सराफ यांनी “या नाटकाचा शतकी प्रयोग एवढ्या उत्साहात साजरा होताना पाहणे आनंददायी आणि अभिमानास्पद आहे,” असे मत व्यक्त केले. सचिन पिळगांवकर यांनी “परफेक्ट अभिनय, दिग्दर्शन आणि कास्टिंग” असे शब्दांत नाटकाचे कौतुक केले, तर आदेश बांदेकर यांनी तरुण कलाकारांना मिळालेला हा आशीर्वाद भाग्याची बाब असल्याचे सांगितले.

चंद्रकांत कुलकर्णी प्रस्तुत, ‘जिगीषा’ निर्मित आणि विनोद रत्ना लिखित-दिग्दर्शित या नाटकाने आजच्या जेन-जी पिढीच्या भावना आणि वास्तव हलक्याफुलक्या शैलीत रंगमंचावर मांडले आहे. त्यामुळे हे नाटक तरुण प्रेक्षकांशी थेट जोडले गेले आहे.
या नाटकाचे निर्माते श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव असून, श्रेयस जोशी, वैभव रंधवे आणि समृद्धी कुलकर्णी या नवोदित कलाकारांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे नाटक अधिक जिवंत वाटत असल्याचे प्रेक्षकांचे मत आहे.
याबाबत दिग्दर्शक व लेखक विनोद रत्ना म्हणाले की, “आजच्या तरुण पिढीचे वास्तव विनोदी शैलीत मांडण्याचा आमचा प्रयत्न होता. प्रेक्षकांनी दिलेले प्रेम हे आमच्यासाठी मोठे यश आहे. शंभरावा प्रयोग हा केवळ टप्पा नसून पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा देणारा आहे.”
उत्कृष्ट लेखन, नेमके दिग्दर्शन आणि नवोदित कलाकारांची दमदार कामगिरी यामुळे ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चर्चेचा विषय ठरत असून, आगामी काळातही ते प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

