पुसेगाव येथे सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त अभिषेक, सत्कार आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
पुसेगाव, 2 जानेवारी:
पुसेगाव येथे प.पू. सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजितसिंह देशमुख (भैय्या) यांनी सेवागिरी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद प्राप्त केले. देवस्थान समिती व ट्रस्टच्या वतीने भैय्यासाहेबांचा सत्कार करण्यात आला.

यात्रेनिमित्त आयोजित राज्यस्तरीय बॅंड महोत्सव आणि श्वान स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी भैय्यासाहेब उपस्थित राहिले. त्यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाने यात्रेचे वैशिष्ट्य वाढवले आणि स्थानिक तसेच राज्यभरातील नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.


