पळशी येथे बेकायदा दारूसाठा जप्त; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, प्रतिनिधी :
माण तालुक्यातील पळशी येथे बेकायदा देशी व विदेशी दारूचा साठा ठेवून चोरट्या विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध म्हसवड पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जून रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पळशी गावातील एका घराच्या आडोशाला छापा टाकण्यात आला. यावेळी तानाजी मुरलीधर गुजले (वय 37, रा. पळशी, ता. माण) याच्या ताब्यातून 39 टॅंगो पंच (90 मि.ली.) देशी दारूच्या बाटल्या आणि 5 इम्पेरियल ब्ल्यू (180 मि.ली.) विदेशी दारूच्या बाटल्या, असा एकूण 2 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासासाठी प्रत्येकी एक बाटली नमुना म्हणून जप्त करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महावीर केराप्पा कोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 171/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि संदिप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.

