राजीव गांधी महाविद्यालयात भूगोल अभ्यास मंडळाचे शानदार उद्घाटन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
उध्दव सरोदे
अर्धापूर :- (नांदेड) प्रतिनिधी

    श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड येथे भूगोल विभागाच्या वतीने भूगोल अभ्यास मंडळाचे शानदार उद्घाटन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.टी.शिंदे हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते तर उद्घाटक म्हणून शंकर नगर कोडगाळ येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक कीर्तनकार हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ.रामचंद्र बदने हे होते तर प्रा.डॉ. माधव बसवंते यांची प्रमुख उपस्थित होती.

   यावेळी भूगोल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.बी. कोटलवार  यांनी प्रास्ताविकामध्ये भूगोल हा विषय अतिशय महत्वाचा असून चार भिंतीच्या बाहेरचा विषय असून अलीकडेच भूगोलाला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे.बदलते हवामान,वाढती लोकसंख्या अशा विविध प्रश्नांना सामोरे जायचे असेल तर भूगोल हा विषय शिकला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.

     यावेळी आपल्या मार्गदर्शनामध्ये प्रा.डॉ. रामचंद्र बदने यांनी भूगोल हा विषय सर्व विषयाला घेऊन चालणारा विषय असून भूगोलाचे ज्ञान अवगत केले तर विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन केले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.टी.शिंदे हे म्हणाले की,भूगोल या विषयाचे कौशल्य आत्मसात केले तर विद्यार्थी स्वावलंबी होऊ शकतो असे प्रतिपादन त्यांनी केले.

      प्रा.बालाजी जाधव यांनी आभार व्यक्त केले.तर या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी,भूगोल विषयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         2025-26 या शैक्षणिक वर्षाचे भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष वेदांग सुशांत भोसकर,उपाध्यक्ष पूजा बालाजी राठोड,सचिव ममता भीमराव खंडागळे,सहजचिव दत्ता रामचंद्र राहिरे,सदस्य म्हणून कुमारी श्रावंती यादव गोरठेकर,कुमारी वंदना सुभाष गोणारे,पांडुरंग सुरेश गाडे,ओमकार बळीराम शिंदे,कुमारी सत्यभामा पुंडलिक सोनटक्के,कुमारी संस्कृती सुनील कदम,राहुल शंकर आस्कूलकर,मयंक विठ्ठल कसबे, व्यंकटी संभाजी शिंदे,युवराज संजय राठोड असे आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *