सिद्धनाथ-जोगेश्वरी हळदी समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न : विवाहसोहळा 13 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता….
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (दिलीपराज कीर्तने )
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या शाही
मंगल विवाह सोहळ्याचा प्रारंभ दिवाळी पाडव्याच्यापहाटे साडेपाच वाजता घटस्थापनेने करण्यात आला. त्याच दिवशी सकाळी 10 वाजता मंदिरातील हत्ती मंडपात श्रींच्या पंचधातूंच्या उत्सवमूर्तिंना हजारो महिलांकडून हळदी लावण्याचा समारंभ, मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आता तुलसी विवाहादिवशी म्हणजे बुधवार 13नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता श्रींचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

शनिवार 02 नोव्हेंंबर रोजी दिवाळीपाडव्यादिवशी सकाळी 10 वाजता मंदिरातील हत्ती मंडपात एका छोटेखानी दिवानावर श्रींच्या पंचधातूंच्या ऊत्सवमूर्ती स्थानापन्न करण्यात आल्या.परंपरागत प्रथेनुसार सालकरीणबाई सौ.राणी गुरव यांच्या हस्ते सर्वप्रथम श्रींना हळदी लावण्यात आल्या त्यानंतर गुरव समाजातील, शहरातील व परगावहून आलेल्या हजारो महिलांढंक्षनी श्रींना हळदी लावल्या. यावेळी महिलांच्या प्रचंड गर्दीमुळे संपूर्ण मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता ढोल, ताशा,सनई-चौघडा आदी मंगल वाद्यांच्या जेगजरात ,चार तासानंतर हा हळदी समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला.

त्यानंतर श्रींच्या मूर्तींना लिंबू,दही,दूध,तूप,पंचामृत व गरम उदकाने अभ्यंगस्नान घालण्यात आले. नंतर या मूर्ती मूळ ठिकाणी स्थानापन्न करण्यात आल्या.
दरम्यान रविवारी दि 03 नोव्हेंबर, भाऊबिजेच्या संध्याकाळी पाच वाजता श्रींची पंचारती,धुपारती घेऊन सालकरी महेश गुरव, पुजारी मंडळी,ढाल,तलवार,


