बावी येथे महिलेचा गळफास घेऊन मृत्यू; अकस्मात मृत्यूची नोंद

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

बार्शी :प्रतिनिधी

बार्शी तालुक्यातील बावी (आ) येथे ४७ वर्षीय महिलेने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मयत महिलेचे नाव वर्षा दयानंद आगलावे (वय ४७, रा. बावी (आ), ता. बार्शी, जि. सोलापूर) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी रात्री ९.४५ वाजण्यापूर्वी वर्षा आगलावे यांनी स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. अज्ञात कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती राहुल नंदकुमार आगलावे (वय ४२) यांनी बार्शी तालुका पोलिसांना दिली. त्यानंतर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ७४/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

घटनेचा पुढील तपास प्रभारी अधिकारी स.पो.नि.अक्षय सोनवणे यांच्या आदेशाने मपोहेकॉ/७०४ डोईफोडे करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *