घरकुलाची चौकशी केल्याच्या कारणावरून शेतकऱ्याला लोखंडी गजाने मारहाण
व्हिजन २४ तास न्यूज
बार्शी :प्रतिनिधी
ग्रामसेवकांकडे घरकुलाबाबत चौकशी का करता, या कारणावरून एका ४९ वर्षीय शेतकऱ्याला शिवीगाळ करून लोखंडी गज व हाताने मारहाण केल्याची घटना देवगाव (मा.) येथे घडली. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर लक्ष्मण मांजरे (वय ४९, रा. देवगाव मा., ता. बार्शी) हे २३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेसमोर असताना संदिप तुकाराम मांजरे, शेखर वैजिनाथ मारकड आणि सज्जन धनंजय मांजरे (सर्व रा. देवगाव मा.) यांनी त्यांच्याशी घरकुलाच्या चौकशीवरून वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत लोखंडी गजाने तसेच हाताने मारहाण केली. तसेच, फिर्यादीच्या मुलाला व संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले.
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गु.र. नं. ३१०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक/५९२ चौधरी करीत आहेत.

