गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ३६ जणांना माण तालुक्यातून हद्दपार; मंडळांना ९०० नोटिसा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड : प्रतिनिधी 

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी म्हसवड पोलिसांनी कडक प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. त्याअंतर्गत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल ३६ जणांना २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान माण तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

गणेशोत्सव काळात शासनाच्या नियमांचे पालन व्हावे आणि विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी म्हसवड पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सुमारे ९०० नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पोमण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अमर नारनवर, प्रकाश इंदलकर, महिला पोलीस अंमलदार कोमल काळेल व भामाताई काळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

गणेश विसर्जनाच्या काळात नागरिकांनी तसेच गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *