माण तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकांनी तन-मन-धन अर्पण करावे : गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

देवापूर | प्रतिनिधी

माण तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि कोणताही विद्यार्थी शिक्षणात मागे राहू नये, यासाठी सर्व शिक्षकांनी तन-मन-धन अर्पण करून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन माणचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी केले.

देवापूर येथे आयोजित शिक्षण परिषद भेटीदरम्यान ते शिक्षकांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी माण तालुक्यातील विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता उत्कृष्ट असून शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध अध्यापन पद्धतींचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहन केले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून कोणीही अभ्यासात मागे राहणार नाही, याची दक्षता घेण्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रप्रमुख किरण खोमणे यांनी माण तालुक्यातील शिक्षक होतकरू व गुणवंत असल्याचे सांगत, तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी खान अकॅडमी स्वाध्याय, ‘एक पेड माँ के नाम’ यासह विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत ते प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले.

यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक बालाजी जाधव, अनिल पाटोळे, शहाजी नरळे आणि संजय पैकेकरी यांनी विविध शैक्षणिक विषयांवर शिक्षकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात नव्याने सुरू झालेल्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवड, देवापूर, जांभुळणी आणि पुळकोटी या शाळांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक कोरडे, पर्यवेक्षक धनाजी चिंचकर, केंद्रप्रमुख किरण खोमणे, विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *