पत्रकार राजकुमार इकडे यांना ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ जाहीर
व्हिजन २४ तास न्यूज
पारनेर, प्रतिनिधी :
सामाजिक, पत्रकारिता व जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पत्रकार राजकुमार संपतराव इकडे (रा. रांजणगाव रोड, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांची ‘बी द चेंज फाउंडेशन’ तर्फे दिल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणे, जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करणे तसेच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तनासाठी प्रेरणा निर्माण होत असल्याची भावना संस्थेने व्यक्त केली आहे.
रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी शिर्डी येथे होणाऱ्या भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कारामध्ये ट्रॉफी, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, विशेष भेटवस्तू तसेच पारंपरिक महाराष्ट्रीयन फेटा प्रदान करण्यात येणार आहे.
‘बी द चेंज फाउंडेशन’चे अध्यक्ष अभिषेक तुपे यांनी पाठविलेल्या निमंत्रणपत्राद्वारे राजकुमार इकडे यांना पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

