म्हसवड चे सचिन नवगण यांना ‘समाजसेवा शिरोमणी’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड , प्रतिनिधी :
सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत सातारा जिल्ह्यातील म्हसवड गावचे सचिन बापूराव नवगण यांची ‘समाजसेवा शिरोमणी पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय प्रज्ञा अलंकरण’ यासाठी निवड करण्यात आली आहे. हा सन्मान १४ जून २०२६ रोजी अमरावती येथे आयोजित अखिल भारतीय संत चेतना महाकुंभ, प्रकृती-आध्यात्म समागम तसेच २४ व्या अखिल भारतीय प्रतिभा महासम्मेलनात प्रदान करण्यात येणार आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यात देशभरातील संत-महंत, आध्यात्मिक गुरु, साध्वी, ज्योतिषाचार्य, कथावाचक, पुरोहित, योगगुरू, समाजसेवक, विविध क्षेत्रांतील प्रतिभावंत आणि संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सचिन नवगण यांची ‘समाजसेवा शिरोमणी’ पुरस्कारासाठी झालेली निवड ही सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक आणि नागरिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

