“आपली सतर्कता हाच चोरीवर मोठा प्रतिबंध” — सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांचे नागरिकांना आवाहन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड : प्रतिनिधी 

            सध्या वाढत्या उकाड्यामुळे अनेक नागरिक घराबाहेर, अंगणात किंवा ओट्यावर झोपत असल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी घरांना बाहेरून कडी लावून किंवा दारे उघडी ठेवून झोपण्याचे प्रकार घडत असल्याने चोरीच्या घटनांना आमंत्रण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर म्हसवड पोलीस ठाणे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

     पोलीस प्रशासनाने नागरिकांना घराचे मुख्य दरवाजे व खिडक्या व्यवस्थित बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. घराबाहेर झोपत असल्यास सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी किंवा बँक लॉकरमध्ये ठेवाव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.

    तसेच परिसरात अनोळखी व्यक्ती आढळल्यास किंवा रात्रीच्या वेळी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेजाऱ्यांनीही एकमेकांवर लक्ष ठेवून सतर्क राहावे, असे पोलिसांनी म्हटले आहे.

“आपली सतर्कता हाच चोरीवर सर्वात मोठा प्रतिबंध आहे,” असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी केले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *